"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

"आपण सारे अर्जुन"व. पु. चं "आपण सारे अर्जुन" हे पुस्तक दोन वर्ष पूर्वी वाढदिवसाची भेट म्हणून सागर (CA Sagar Kokne) आणि विनायक यांनी दिल होत.

दर दोन महिन्यांनी पुस्तकांच कपाट आवरताना नेहमी समोर दिसायचं वाचायला घेऊ अस वाटायचं आणि नेहमी राहून जायचं.....पण बरेच महिने समोर दिसणार हे पुस्तक नेमक यावेळी वाचाव अस वाटन आणि ते वाचून पूर्ण होण हे नेमक या वेळी का घडल अगोदर कळल नाही.... पण त्याचहि उत्तर याच पुस्तकान दिले.

अंतर्मुख: करायला लावत हे पुस्तक .........पुस्तक वाचता वाचता आपण कधी अर्जुन होऊन जातो हे कळत नाही ..... व.पु. नी सांगितलेले प्रसंग आपण आपाल्या जीवनाशी जूळवून पाहायला लागतो....त्यात आपण स्वत:ला पहायला लागतो.
पुस्तकात व पु अस लिहतात "मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसा त्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे होईल अस नाही. आयुष्य हि एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो , अस नाही.असं का होतं?आपल्याबरोबर , आपल्या जीवन यात्रेबरोबर एक अज्ञात शक्ती प्रवास करीत असते. त्या शक्तीनंही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहित नसतं."
व.पु. नी त्याच्या आयुष्यातील बरेच प्रसंग सागितले आहेत.... आपल्या आयुष्यात घडलेले असतील किव्हा घडतील असे....
शेवटी व पु अस म्हणतात..."कृष्णत्व म्हणजे पूर्णत्व.वैचारिक पातळीवरच पूर्णत्व.ममत्व, अहंकारशून्य पातळीवरच पूर्णत्व!निष्काम कर्मयोग म्हणजे तरी काय?'जर-तर ची भाषा विसरण, Unconditional होण. मागणी नसताना काम करायला, स्वार्थ नसताना 'कार्यात झोकून द्यायला' वेगळ निग्रह लागतो. कारण तिथे राहतो सेवाभाव. मनात असत समर्पण!
प्रेमातून भक्तीकडे नेणारा सोपान. बहाणे संपले कि, माग उरतात शुद्ध हेतू.हेतूंच्या पलीकडचा टप्पा म्हणजे मोकळेपणी हेतू प्रकट करण्याच धाडस. संवाद करण्याची भूमीका, ओढ.
त्यासाठी मुल आयुष्यावर प्रेम हवं. स्वत:वर हवं.आपण आपली निर्भत्सना करीत राहिलो, तर कुटुंब, परिवार अंनि समाजावर कधी प्रेम करणार?
अवघ्या अतित्वावर प्रेम हवं. किमान समोरच्या माणसांवर हवं. त्यासाठी संवाद हवा. भावना व्यक्त करण्यासाठी संवाद. पण संवाद शब्दातला 'सं' जागा चुकून 'भावना' शब्दामागे पडला, तर माग उरतो, तो 'वाद'. आणि भावनेची 'संभावना' होते.
कृष्ण आणि अर्जुन दूर ठेवू.आपण सगळे अर्जुन असलो, तरीही प्रत्येक अर्जुनात कृष्ण आहे.त्याचं नाव श्रेयश . आपण त्याची गळचेपी करतो. प्रेयासला कृष्ण मानतो. त्याच क्षणी कृष्ण अंतर्धान पावतो. माग उरतो अर्जुन.'सीदन्ति मम गात्राणि' म्हणणारा.म्हणजे कोण?तर तुम्ही आणि मी!
धन्यवाद! सागर आणि विनायक...या अनमोल भेटीसाठी.

www.isamyak.com

No comments: