"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

"आपण सारे अर्जुन"व. पु. चं "आपण सारे अर्जुन" हे पुस्तक दोन वर्ष पूर्वी वाढदिवसाची भेट म्हणून सागर (CA Sagar Kokne) आणि विनायक यांनी दिल होत.

दर दोन महिन्यांनी पुस्तकांच कपाट आवरताना नेहमी समोर दिसायचं वाचायला घेऊ अस वाटायचं आणि नेहमी राहून जायचं.....पण बरेच महिने समोर दिसणार हे पुस्तक नेमक यावेळी वाचाव अस वाटन आणि ते वाचून पूर्ण होण हे नेमक या वेळी का घडल अगोदर कळल नाही.... पण त्याचहि उत्तर याच पुस्तकान दिले.

अंतर्मुख: करायला लावत हे पुस्तक .........पुस्तक वाचता वाचता आपण कधी अर्जुन होऊन जातो हे कळत नाही ..... व.पु. नी सांगितलेले प्रसंग आपण आपाल्या जीवनाशी जूळवून पाहायला लागतो....त्यात आपण स्वत:ला पहायला लागतो.
पुस्तकात व पु अस लिहतात "मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसा त्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे होईल अस नाही. आयुष्य हि एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो , अस नाही.असं का होतं?आपल्याबरोबर , आपल्या जीवन यात्रेबरोबर एक अज्ञात शक्ती प्रवास करीत असते. त्या शक्तीनंही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहित नसतं."
व.पु. नी त्याच्या आयुष्यातील बरेच प्रसंग सागितले आहेत.... आपल्या आयुष्यात घडलेले असतील किव्हा घडतील असे....
शेवटी व पु अस म्हणतात..."कृष्णत्व म्हणजे पूर्णत्व.वैचारिक पातळीवरच पूर्णत्व.ममत्व, अहंकारशून्य पातळीवरच पूर्णत्व!निष्काम कर्मयोग म्हणजे तरी काय?'जर-तर ची भाषा विसरण, Unconditional होण. मागणी नसताना काम करायला, स्वार्थ नसताना 'कार्यात झोकून द्यायला' वेगळ निग्रह लागतो. कारण तिथे राहतो सेवाभाव. मनात असत समर्पण!
प्रेमातून भक्तीकडे नेणारा सोपान. बहाणे संपले कि, माग उरतात शुद्ध हेतू.हेतूंच्या पलीकडचा टप्पा म्हणजे मोकळेपणी हेतू प्रकट करण्याच धाडस. संवाद करण्याची भूमीका, ओढ.
त्यासाठी मुल आयुष्यावर प्रेम हवं. स्वत:वर हवं.आपण आपली निर्भत्सना करीत राहिलो, तर कुटुंब, परिवार अंनि समाजावर कधी प्रेम करणार?
अवघ्या अतित्वावर प्रेम हवं. किमान समोरच्या माणसांवर हवं. त्यासाठी संवाद हवा. भावना व्यक्त करण्यासाठी संवाद. पण संवाद शब्दातला 'सं' जागा चुकून 'भावना' शब्दामागे पडला, तर माग उरतो, तो 'वाद'. आणि भावनेची 'संभावना' होते.
कृष्ण आणि अर्जुन दूर ठेवू.आपण सगळे अर्जुन असलो, तरीही प्रत्येक अर्जुनात कृष्ण आहे.त्याचं नाव श्रेयश . आपण त्याची गळचेपी करतो. प्रेयासला कृष्ण मानतो. त्याच क्षणी कृष्ण अंतर्धान पावतो. माग उरतो अर्जुन.'सीदन्ति मम गात्राणि' म्हणणारा.म्हणजे कोण?तर तुम्ही आणि मी!
धन्यवाद! सागर आणि विनायक...या अनमोल भेटीसाठी.

www.isamyak.com

उपनिषद

वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल.जगातील पहिले साहित्य वेद.वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेदयजुर्वेदसामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. या वेदांचे संहिताआरण्यकेब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते.

वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे. श्रीमद्भगवद्गीता हे एक उपनिषद आहे.
प्राचीन भारतीय आर्यांचे तात्विक विचार  उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.
१.   ईश,२. केन, ३. कठ,४.प्रश्न ,५. मुंडक,६. मांडूक्य ,७.तैत्तिरीय,८. ऐतरेय,९.छांदोग्य,१०. बृहदारण्यक,११. नृसिंहपूर्वतापिनी ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.
ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.
सुमारे २०० च्या आसपास काही गौण उपनिषदे मानली गेली आहेत. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.
उपनिषद सूची-
१३.अक्षमाला १४.अक्षी १५.अथर्वशिखा १६. अथर्व शिरस १७. अद्वयतारक १८.अद्वैत १९.अध्यात्म २०. अन्नपूर्णा २१.अमृतनाद २२.अमृतबिंदू २३ अल्ला २४.अवधूत २५. अव्यक्त  २६.आचमन २७.आत्म २८. आत्मपूजा २९.आत्मप्रबोध ३०. आत्मपूजा .....एकशें आठ उपनिषदे.


ऋग्वेदाच्या २१ शाखा,
यजुर्वेदाच्या १०९
सामवेदाच्या १०००
आणि
अथर्ववेदाच्या ५० 
अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदें १०८ आहेत तीं :-
१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो - (बिन्दु), ३८ नाद - (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राज्जक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्र्ल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङगल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र - (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म - (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गुरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम. " (रा. गी. १८-३)

यातली प्रत्येक बिंदू आपल्या समोर पुढच्या लेखापासून मांडतो....

- i सम्यक 

(source of info is wikipedia) 

" अपमान

नमस्कार मित्रांनो ! काही महिन्यांपूर्वी गावी गेलो असताना आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या मित्राच्या मुलांसोबत संवाद साधत होतो. चुणचुणीत असणाऱ्या धाकट्याने विचारलं, " काका, आमचे काही श्रीमंत नातेवाईक जमेल तेव्हा आमचा अपमान करीत असतात. मला प्रचंड राग येतो. आई - बाबा सहन करतात. मला नाही सहन होत. अस्वस्थ होतो मी. काय करू ? " मी शांत स्वरात त्याला सांगू लागलो , " अमोल, हा अनुभव मी सुद्धा तुझ्या वयात खूप वेळा घेतलाय. यावरील उपाय खूप साधे आणि सोपे आहेत. मुळात अपमान करणाऱ्यांबाबत रागाची वा सुडाची भावना ठेवू नकोस. या भावनेनेच तू अस्वस्थ होतोस. अशा अस्वस्थपणाने आपली ऊर्जा आपणच वाया घालवतो. अपमान करणाऱ्यांपेक्षा तू तुझ्या क्षेत्रात मोठा हो. त्यांना तुझ्या मोठा होण्याने आपोआपच शिक्षा मिळेल व तुझी ऊर्जा सुध्दा सत्कारणी लागेल." 
एखाद्याने आपला केलेला अपमान आपण मानलाच नाही तर तो होतही नाही. करणाऱ्यालाही मग अपमान केल्याचा आनंद मिळत नाही.एखादा आपला अपमान करण्याची बरीच कारणे असतात. अहंकार, सुडाची भावना, द्वेष वा मत्सर, वंशाभिमान, स्पर्धेतून येणारी असुरक्षितता, नैराश्य आणि तत्सम मानसिक असंतुलन इ. कारणांमधून अपमानाची व्युत्पत्ती होते. बऱ्याचदा गैरसमजातूनही अपमान झाल्यासारखं वाटतं. एखादी व्यक्ती प्रचंड शिस्तप्रिय अथवा " Perfectionist " असेल तर तिच्या वाचिक वा शारीरिक प्रतिक्रिया सुद्धा आपणांस अपमानास्पद वाटू शकतात. त्या व्यक्तीचा मात्र अपमान करण्याचा हेतू नसतो. काही समाजांच्या वा व्यक्तीसमूहांच्या चालीरीतींनुसार आपण न वागल्यास त्यांना तो अपमान वाटू शकतो.अशाच एका सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांच्या नेत्याचा उल्लेख मी " आदरणीय " असा केला. श्रोत्यांची अपेक्षा होती कि मी " पुज्यनीय " हा शब्द वापरायला हवा होता. थोडक्यात काय तर " धारणां " मधल्या फरकांमुळे सुध्दा ' अपमानजन्य ' परिस्थितीची निर्मिती होऊ शकते! मेंदूची प्रगल्भता जेवढी कमी तेवढी अपमानाची भावना जास्त. टीका आणि अपमान यामधील फरक न कळणारे बरेच मागासलेले समाज आपल्या अवतीभोवती असतात. टिकेचं संयुक्तिक उत्तर देता नाही आलं कि " अपमान झाल्या " ची मोठी बोंब मारायची ! - ही या मागासलेल्यांची नेहमीची रणनीती असते. साधारणपणे बौद्धिक मांद्य अथवा मानसिक संकुचितपणाने पछाडलेल्या समाजांमध्ये मानापमानाचे प्रसंग पदोपदी येत असतात. अशा समाजांमध्ये तथाकथित " श्रद्धास्थानां " ची अगदी रेलचेल असते. बौद्धिक मांद्य जोरकस असल्याने बऱ्याच श्रध्दास्थानांचं वास्तवदर्शी आकलन केलं जात नाही वा करू दिलं जात नाही. "मानापमाना " ची गोळी सकाळ - संध्याकाळ चघळणारा असा समाज मग आपोआपच निस्तेज होत जातो. अशा समाजावर राज्य करणं मग कुवत नसलेल्या अहंमन्य लोकांना सहजसाध्य होतं.
अपमानाला सामोरं जाणं वा टाळणं अथवा अपमान पचवणं किंवा अपमान करणाऱ्यांना हाताळणं खूप सोपं असतं. यासाठी अपमान होण्याच्या वा करण्याच्या तीन मुख्य प्रक्रिया लक्षात घ्यायला हव्यात. अपशब्द ( वाचिक वा कायिक वा लिखित बोली ), अनुल्लेख आणि अन्याय या त्या तीन प्रक्रिया होत.
अपशब्द वापरणाऱ्यांना शक्यतो टाळलेलं बरं. ही टाळण्याची मानसिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अपमान करणाऱ्याचं सांस्कृतिक मागासलेपण ग्रुहित धरलं कि आपण स्वतःच खुदकन हसू शकतो. ह्यांना उत्तर द्यायचंच असेल तर ते संयमित पण रोखठोक असावं. आपल्या एका उत्तरानंतर आपण दुर्लक्ष करावं कारण आपली ऊर्जा आणि वेळ हा आपणच वाचविला पाहिजे. " अनुल्लेखाने अपमानित " करण्याचा घ्रुणास्पद प्रकार हा जगभर चालतो. योग्य मंचावर आपल्या गौरवास्पद उल्लेखासाठी आपण आपली कामगिरी उंचावत रहायचं असतं. अनुल्लेखाने टाळणारे स्वतःला असुरक्षित समजत असतात. अशा ' कमअस्सल ' लोकांशी भांडण्यात आपण आपली शक्ती का वाया घालवावी ! स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवत आपण आपल्या ध्येयावर जोमाने काम करीत रहायचं. एखादा मोठा फलंदाज छोट्या अपयशाने जेव्हा अपमानित केला जातो तेव्हा तो मुर्खांच्या नादी न लागता पुढच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने उत्तर देतो.
विविध मार्गांनी सतत अन्याय करीत अपमानित करण्याचा पारंपारिक प्रकार अहंमन्य बलदंडांकडून केला जातोच.अशावेळी भावनांच्या आहारी न जाता तारतम्याने वागलं पाहिजे. मुळात आपण अडचणीत असतो वा दुर्बल असतो म्हणून हा अपमान सहन करावा लागतो. थंड डोक्याने अपमान गिळत वेळ निभावून न्यायची असते. स्वतःला मोठं करण्यासाठी वा अन्यायातून सुटका करून घेण्यासाठी किंवा आपलं नेटवर्क बलशाली होईपर्यंत संयमाने योग्य संधीची वाट पहायला हवी. अपमान आणि अन्याय करणाऱ्या बलदंडांना कळणारही नाही अशा पध्दतीने आपली ऊर्जा आणि गरीमा वाढवायची असते. तोपर्यंत या नालायकांशी जमवून घेण्याचं नाटक करायचं असतं.
प्रत्येक अपमान हा आपलं स्फुल्लिंग चेतवणारा ठरला पाहिजे. स्वतःला सिध्द करण्याची ऊर्जा आपण त्यातून घेतली पाहिजे. काही वेळा आपल्या चुकांमुळे सुध्दा आपण अपमानित होण्याची परिस्थिती ओढवून घेतो. आपल्या चुकीचं विश्लेषण करून व आवश्यक असल्यास ती मान्य करून पुढं जात राहिलं पाहिजे. प्रासंगिक अपमानांनी चित्त विचलित झालं तर स्वतःशीच शांतपणे एकांतात संवाद साधायचा आणि आपल्या मोठ्या ध्येयाची आठवण करायची. ध्येय आठवलं कि ऊर्जा आठवते नि आपण स्वतःला पुन्हा सन्मानित करू लागतो. आपण स्वतःला स्वतःशी सन्मानित ठेवू शकलो तर कोणत्याही अपमानाचे वार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत ! जग किंवा समाज बदलविणाऱ्या कोणत्याही महापुरुषाला आठवा. बहुतेकांनी बरेच अपमान सोसत आपलं इप्सित ध्येय गाठलं आहे. मन मस्त राखा आणि मेंदू कार्यान्वित ठेवा, कोणताही अपमान तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही !
------- डॉ. गिरीश जाखोटिया.

महर्षी अरविंद घोष


जन्म: अगस्त 15, 1872
निधन: दिसंबर 5, 1950
उपलब्धियां: स्वतंत्रता सेनानी, कवि, प्रकांड विद्वान, योगी और महान दार्शनिक
अरविंद घोष एक बहुमुखी प्रतिभा के धनी व्यक्ति थे। वह एक स्वतंत्रता सेनानी, कवि, प्रकांड विद्वान, योगी और महान दार्शनिक थे। उन्होंने अपना जीवन भारत को आजादी दिलाने और पृथ्वी पर जीवन के विकास की दिशा में समर्पित कर दिया।
अरविंद के पिता का नाम केडी घोष और माता का नाम स्वमलता था। अरविन्द घोष एक प्रभावशाली वंश से सम्बन्ध रखते थे। राज नारायण बोस, बंगाली साहित्य के एक जाने माने नेता, श्री अरविंद के नाना थे। अरविंद घोष ना केवल आध्यात्मिक प्रकृति के धनी थे बल्कि उनकी उच्च साहित्यिक क्षमता उनकी माँ की शैली की थी। उनके पिता एक डॉक्टर थे।
जब अरविन्द घोष पांच साल के थे उन्हें दार्जिलिंग के लोरेटो कान्वेंट स्कूल में भेज दिया गया। दो साल के बाद 1879 में अरविन्द घोष को उनके भाई के साथ उच्च शिक्षा के लिए इंग्लैंड भेज दिया गया। अरविन्द ने अपनी पढाई लंदन के सेंट पॉल से पूरी की। वर्ष 1890 में 18 साल की उम्र में अरविन्द को कैंब्रिज में प्रवेश मिल गया। यहाँ पर उन्होंने स्वयं को यूरोपीय क्लासिक्स के एक छात्र के रूप में प्रतिष्ठित किया। अपने पिता की इच्छा का पालन करने के लिए, उन्होंने कैम्ब्रिज में रहते हुए आईसीएस के लिए आवेदन भी दिया। उन्होंने 1890 में पूरे विश्वास के साथ भारतीय सिविल सेवा परीक्षा उत्तीर्ण की। हांलांकि वह घुड़सवारी के एक आवश्यक इम्तेहान में खरे उतरने में विफल रहे और इसलिए उन्हें भारत सरकार की सिविल सेवा में प्रवेश की अनुमति नहीं मिली।
वर्ष 1893 में अरविन्द घोष भारत वापस लौट आये और बड़ौदा के एक राजकीय विद्यालय में उपप्रधानाचार्य बन गए। उन्हें 750 रुपये वेतन दिया गया। उन्हें बड़ौदा के महाराजा द्वारा बहुत सम्मान मिला। अरविन्द घोष को ग्रीक और लैटिन भाषाओ में निपुणता प्राप्त थी। 1893 से 1906 तक उन्होंने संस्कृत, बंगाली साहित्य, दर्शनशास्त्र और राजनीति विज्ञान का विस्तृत रूप से अध्यन किया।
1906 में बंगाल के विभाजन के बाद उन्होंने अपनी नौकरी से इस्तीफा दे दिया और 150 रूपए के वेतन पर बंगाल नेशनल कॉलेज में शामिल हो गए। इसके बाद वो क्रांतिकारी आंदोलन में तेज़ी से सक्रीय हो गए। अरविन्द घोष ने 1908 से भारत के स्वतंत्रता संग्राम में एक प्रमुख भूमिका निभाई। अरविंद घोष भारत की राजनीति को जागृति करने वाले मार्गदर्शकों में से एक थे। उन्होंने अंग्रेजी दैनिक ‘वन्दे मातरम’ पत्रिका का प्रकाशन किया और निर्भीक होकर तीक्ष्ण सम्पादकीय लेख लिखे। उन्होंने ब्रिटिश सामान, ब्रिटिश न्यायलय और सभी ब्रिटिश चीजों के बहिष्कार का खुला समर्थन किया । उन्होंने लोगों से सत्याग्रह के लिए तैयार रहने के लिए कहा ।
प्रसिद्ध अलीपुर बम केस अरविंद घोष के जीवन में एक महत्वपूर्ण मोड़ साबित हुआ। एक वर्ष के लिए अरविन्द अलीपुर सेंट्रल जेल के एकान्त कारावास में एक विचाराधीन कैदी रहे। वह अलीपुर जेल की एक गंदे सेल में थे जब उन्होंने अपने भविष्य के जीवन का सपना देखा जहाँ भगवान ने उन्हें एक दिव्य मिशन पर जाने का आदेश दिया। उन्होंने क़ैद की इस अवधि का उपयोग गीता की शिक्षाओं का गहन अध्ययन और अभ्यास के लिए किया। चित्तरंजन दास ने श्री अरविन्द का बचाव किया और एक यादगार सुनवाई के बाद उन्हें बरी कर दिया गया।
अपने कारावास के दौरान अरविंद घोष ने योग और ध्यान में अपनी रुचि को विकसित किया। अपनी रिहाई के बाद उन्होंने प्राणायाम और ध्यान का अभ्यास शुरू कर दिया 1910 में श्री अरविंद घोष कलकत्ता छोड़ पांडिचेरी में बस गए। पांडिचेरी में वह अपने एक दोस्त के घर पर रुके। शुरुआत में वह अपने चार से पांच साथियों के साथ रहे। फिर धीरे धीरे सदस्यों की संख्या में वृद्धि हुई और एक आश्रम की स्थापना हुई ।
पांडिचेरी में चार साल तक योग पर अपना ध्यान केंद्रित करने के बाद वर्ष 1914 में श्री अरविन्द ने आर्य नामक दार्शनिक मासिक पत्रिका का शुभारम्भ किया। अगले साढ़े 6 सालों तक यह उनकी सबसे महत्वपूर्ण रचनाओं में से ज्यादातर के लिए एक माध्यम बन गया जो कि एक धारावाहिक के रूप में आयीं। इनमे गीता का वर्णन, वेदों का रहस्य, उपनिषद, द रेनेसां इन इंडिया, वार एंड सेल्फ डिटरमिनेसन, द ह्यूमन साइकिल, द आइडियल ऑफ़ ह्यूमन यूनिटी और द फ्यूचर पोएट्री शामिल थीं। 1926 में श्री अरविन्द सार्वजनिक जीवन से सेवानिवृत्त हो गए।
श्री अरविंद के दर्शनशास्त्र तथ्य, अनुभव, व्यक्तिगत आभाष और एकद्रष्टाया ऋषि की दृष्टि होने पर आधारित है। अरबिंदो की आध्यात्मिकता अभिन्नताओं के कारण एक जुट थी। श्री अरविंद का लक्ष्य केवल किसी व्यक्ति को उन बेड़ियों से जो उन्हें जकड़े हुए थीं और इस के एहसास से मुक्त करना नहीं था बल्कि दुनिया में परमात्मा की इच्छा को सम्पन्न करना, एक आध्यात्मिक परिवर्तन लागू करना और मानसिक, मार्मिक, भौतिक जगत और मानव जीवन में दिव्यशक्ति और दिव्य आत्मा को लाना था।
श्री अरविन्द का देहांत 5 दिसंबर 1950 को पांडिचेरी में 78 वर्ष की आयु में हो गया।