"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

नवज्योत कौर


आपल्या मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये देशाचं नाव काढावं म्हणून पंजाबचा एक शेतकरी दर वर्षी तिच्यावर खर्च करायला बँकेकडून कर्ज काढत राहिला। कर्जाची रक्कम झाली तब्बल 13 लाख रुपये तेव्हा त्या मुलीने- नवज्योत कौरने सिनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत चक्क सुवर्ण पदक जिंकून खरोखरच देशाचं नाव काढलं तेव्हा ती सुवर्ण पदक जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली।म्हणूनच नवज्योत कौरची कहाणी आपणा सर्वानाच प्रेरणादायी ठरावी।


 पंजाबमधल्या एका छोट्याशा गावातील सुखचैन सिंगनी आपल्या दोन्ही मुलींना कुस्तीकडे वळवलं तेव्हा त्यांची चेष्टा केली गेली। मोठी नवजित आणि धाकटी नवज्योत जीव तोड मेहनत करत राहिल्या। मोठीने दुखापतीमुळे कुस्ती सोडली। 2013 मध्ये अंतिम फेरीत नवज्योत पराभूत झाली तर 2014 मध्ये कंबर दुखीमुळे तिला हॉस्पिटलमध्ये काढावे लागले। कुठलीही सरकारी मदत न मिळाल्यामुळे पुन्हा कर्ज काढावं लागलं। त्यावर मात करून नवज्योत पुन्हा उभी राहिली।सतत खडतर सराव करून तिने परवा शुक्रवारी आपल्या पित्याचं स्वप्नं साकार केलं तेव्हा तिने त्याच जपानी प्रतिस्पर्धी महिलेला 9-1 अशी सहज धूळ चारली। आता तिचं लक्ष्य आहे ऑलिम्पिक पदक। ते ती मिळविलच यात शंकाच नाही। आताच्या तिच्या सुवर्ण पदकामुळे तिच्या पित्याच्या कर्जाचा भार नक्कीच उतरेल अशी आशा करूया।
दुर्दैव म्हणजे आंतर राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवूनही नवज्योत गेली चार वर्षे क्लार्क म्हणून काम करतेय आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रित कौर डीएसपी म्हणून पंजाबमध्ये कार्यरत आहे। जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट मोठा खेळ आहे की कुस्ती हे आपल्या क्रीडा मंत्र्यांना कधी कळणार ? 


संजीव पेडणेकर

No comments: