"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

मोदी सरकार- तब्बल 89500 लोकांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय


आतापर्यंत जगातील कुठल्याच देशाने एकाच वेळी 90 हजार लोकांना सरकारी नोकऱ्या दिलेल्या नाहीत। मोदी सरकारने तब्बल 89500 लोकांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेऊन असा भीम पराक्रम केलाय ज्याची गिनीज बुकमध्ये नोंद करावी लागेल।
फक्त दहावी उत्तीर्ण किंवा इंजिनिअर असलेल्या तरुणांनी 12 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरून ह्या संधीचा लाभ घ्यायलाच हवा। सोशल मीडियावर मोदींनी किती लोकांना रोजगार दिलाय म्हणून मोदींच्या नावाने बोटे मोडणाऱ्या नमोरुग्णांनी हि माहिती आपल्या परिचिताना अन नातेवाईकांना दिली तर निदान त्यांची दुवा तरी त्यांना लाभेल।
रेल्वे मध्ये 1.2 लाख जागा रिकाम्या आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगली सेवा देण्यासाठी मोदी सरकारने हा धाडसी निर्णय घेतलाय, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर दर वर्षी 4 हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल। ह्यापुढे सरकारी नोकऱ्यांवर गंडांतर येईल, नवीन सरकारी नोकर भरती होणार नाही असा लोकांचा ठाम समज दृढ होत असताना तब्बल 90 हजार नवीन भरती करायचा मोदी सरकारचा हा निर्णय म्हणूनच खूप धाडसी निर्णय म्हणायला हवा। वय वर्षे 18 ते 31 वयोगटातील इच्छुकांनी सोबत दिलेली इंडियन एक्सप्रेसची लिंक सखोल वाचून अवश्य अर्ज करावा।
केवळ रेल्वेमध्येच नव्हे तर सागरमाला, भारतमाला ह्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे येत्या दोन वर्षात प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे। दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण बरोबरच इंजिनिअर असलेल्या तरुणांनी गुगलवर बारकाईने त्या प्रकल्पांवर लक्ष ठेवून नोकरी मिळवावी। त्या शिवाय जेएनपीटी मध्येही प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती अवघ्या काही महिन्यात सुरू होईल। सोशल मीडियावर काही लोक तुमचा बुद्धिभेद करून नकारात्मक वातावरण करायचा प्रयत्न करताहेत। त्यामुळे तुमची संधी तर हुकेलच पण मोठया प्रमाणावर पर प्रांतीय रेल्वे, सागरमाला, भारतमाला आणि जेएनपीटी मध्ये घुसखोरी करतील आणि तुम्ही मात्र हात चोळत बसाल।
संजीव पेडणेकर
संदर्भ- इंडियन एक्सप्रेस
16/2/2018
#89500_jobs_in_indian_railway

No comments: