"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

पी.चिदंबरम अर्थमंत्री असताना 80-20 सोने आयात योजनेत तब्बल 1.3 लाख कोटींचे देशाला नुकसान सोसावे लागले

"पी.चिदंबरम अर्थमंत्री असताना 80-20 सोने आयात योजनेत तब्बल 1.3 लाख कोटींचे देशाला नुकसान सोसावे लागले।" असा स्पष्ट उल्लेख 2016 च्या कॅगच्या अहवालात नोंदवला गेलाय, ज्यामुळे मेहुल चोक्सी आणि निरव मोदीना त्याचा लाभ उठवता आल्याचा संशय व्यक्त करून पब्लिक अकाउंटस कमिटीने त्याची गंभीरपणे चौकशी सुरू केलीय। त्या 80-20 सोने आयात योजनेचा आणि पीएनबी घोटाळ्याचा काही संबंध आहे का याचीही चौकशी सुरू झालीय। अशी बातमी आजच्या टाईम्स ऑफ इंडियाने दिलीय।
नवीन वर्षात मोदी सरकार धुवांधार फलंदाजी करून चौकार अन षटकारांची आतषबाजी करेल हे नक्की।कार्ति चिदंबरम जरी 4-5 कोटीमध्ये अडकलेला दिसत असला तरी प्रत्यक्षात या आकडयामागे किती शून्य दडलेली आहेत हे पुढे दिसेलच। पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा जावई गुरपाल सिंग जो सिम्बॉली शुगरचा डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आहे तो काल परवाच ओरिएंटल बँकेच्या 148 कोटींच्या गैर व्यवहारात अडकलाय।संजीव पेडणेकर
संदर्भ- टाईम्स ऑफ इंडिया 3/3/2018
बिजनेस टुडे 26/2/2018
युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन आणि एम डी अर्चना भार्गवनी पदाचा गैर वापर करून अफाट संपत्ती जमवलीय म्हणून त्यांना अटक केली गेलीय। त्यांच्याकडे 2.85 कोटींची ज्वेलरी सापडलीय। शिवाय बँकेत 2.26 कोटी, फिक्स डिपॉजीट 5.42 कोटी आणि तीन मजली बंगला आणि इतर अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता सापडलीय।
येत्या काळात असे अनेक चिदंबरम, गुरपाल सिंग आणि अर्चना भार्गव कायद्याच्या कचाट्यात सापडतील अशी अपेक्षा करूया। कारण त्यासाठीच आपण सर्वांनी मोदी सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय।
मोदीजी, सिंचन घोटाळ्यातील आरोपींना तुम्ही कधी गजा आड पाठवणार याची उभा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय। ज्या दिवशी तो दिवस उगवेल त्या दिवशी देशातील करोडो जनता तुमचा उदो उदो करेल हे नक्की।

No comments: