"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

वस्त्रोद्योग क्षेत्रात तब्बल 10 लाख तरुणांना ट्रेनिंग - New skill development scheme


वस्त्रोद्योग क्षेत्रात तब्बल 10 लाख तरुणांना ट्रेनिंग देऊन रोजगार मिळवून देऊ शकेल अशी 1300 कोटींची योजना मोदी सरकारने आखलीय। सदर योजनेचे नाव आहे- New skill development scheme ज्यामुळे स्पिनिंग आणि विव्हिंग वगळता संपूर्ण वस्त्रोद्योग उद्योगाचे तरुणांना प्रशिक्षण तर देण्यात येईलच शिवाय त्यांना त्याच उद्योगात रोजगार मिळवून दिला जाईल। ही योजना 2017-18 ते 2019-20 या कालावधीमध्ये राबवली जाईल।
वस्त्रोद्योग क्षेत्रात योग्य ते प्रशिक्षण मिळालेले तरुण मिळत नाहीत म्हणून सरकारने उद्योगाशी भागीदारी करून ही योजना आखली आहे। त्यामुळे प्रशिक्षित तरुणांना रोजगार हमखास मिळायची संधी आहे। मान्यता प्राप्त शिक्षण देणाऱ्या संस्था, वस्त्रोद्योग उद्योग यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण दिले जाईल। त्यामुळे केवळ एन्ट्री लेव्हल कामगारच नव्हे तर उच्च दर्जाचे सुपरवायजर्स आणि मॅनेजर्सही उद्योगाला मिळतील। परंपरागत हँडलूम, हँडी क्राफ्ट, ज्यूट, सिल्क इत्यादींचा सदर प्रशिक्षणात सामावेश असेल। त्यामुळे ज्यांच्याकडे नंतर स्वतःचा व्यवसाय करायची भव्य स्वप्न असतील त्यांना मुद्रा योजने अंतर्गत अर्थ सहाय्य केलं जाईल। वस्त्रोद्योग क्षेत्रात यापूर्वीच 10.84 लाख तरुणांना प्रशिक्षण दिलं गेलंय। त्यापैकी 8.05 लाख तरुणांना रोजगार मिळालाय।
काल परवाच टाईम्सने एक लक्षवेधी बातमी दिलीय। दहावीमध्ये 80% हुन अधिक गुण मिळवणाऱ्या 4215 विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश घेतलाय। अर्थ व्यवस्थेत येत्या काळात जे बदल होणार आहेत, त्याचा अचूक अंदाज घेऊन काळाच्या पुढे जाणाऱ्या त्या दूरदर्शी मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच। येत्या 5 ते 8 वर्षात लाखो रोजगार असे निर्माण होणार आहेत की जे आज अस्तित्वातच नाहीत। म्हणूनच तरुणांनी फेसबुक, व्हाट्स अपवसर टाईमपास करण्यापेक्षा इंटरनेटवर त्याची अधिकाधिक माहिती घेऊन स्वतःला सक्षम करायला हवं। रोजगाराच्या अशा लाखो संधी मोदी सरकार येत्या 2 वर्षात निर्माण करणाऱ आहेत, त्यासाठी सज्ज व्हा यचं की मोदींच्या नावाने शिमगा करायचा हे तुम्हीच ठरवा।
संजीव पेडणेकर
संदर्भ- बिजनेस स्टॅंडर्ड

http://www.business-standard.com/article/news-cm/cabinet-approves-scheme-for-capacity-building-in-textiles-sector-scbts-for-the-period-from-2017-18-to-2019-20-117122100190_1.html

No comments: