"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

सम्यक म्हणजे काय..?


सम्यक म्हणजे काय ...?

सोशल मेडिया वरील अनेक ग्रुप आणि आपल्या बुद्ध साहित्यात सम्यक हां शब्द आवर्जून येतो 
सम्यक चा अर्थ गौतम बुद्धांना जसा अपेक्षित आहे तो समजून घेण्यासाठी  बुद्धानीं संगीतलेले काही उपदेश परखावे लागतील.
बुद्धानी चार आर्य सत्य सांगितले आहेत 
1)
दुःख
2)
दुःखाचे कारण 
3)
दुःख निवारण 
4)
आणि दुःख निवण्याचा मार्ग

1)
दुःख :- हे बुद्धानी सांगितलेले पाहिले आर्य सत्य आहे .सर्व जगात दुःख आहे.दुःखा शिवाय सुखाची किंमत कळाली नसती.माणव जन्म वेळी जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो तेव्हा पहले दुःखची जाणीव होत असावी कारण 9 महीने आईच्या पोटात एकरूप झलेलाल तो भ्रूण जेव्हा बाहेर भूतलाववर येतो तेव्हा त्याला असह्य अस्या वेदना होत असाव्या म्हणून तो रडत येतो.तसेच मरते समयी माणसाला खुप दुःख होते तो त्याने जे आयुष भर कमवलेले असते ते सर्व सोडून तो जात आहे याचे दुःख .जन्म आणि मृत्यु त्यांच्या मधील जो काल असतो त्यात ही अनेक दुःख असतात.सर्व प्रथम माणसाने एवढे लक्षात घ्यावे की या जगात दुःख आहे.

2)
दुःखाचे कारण
माणसाला होणाऱ्या दुःखा चे कारण काय..?
आता आपण असे समजतो की दुःख हे मानवनिर्मित आहे किंवा भावना प्रगट करन यातून तैयार झालेली भावना मंजे दुःख होय.पण बुद्ध सांगतात .हे दोन्ही ही गोष्टी चूक आहेत.दुःख हे कार्यकारणनियमाने उत्पन्न झाले आहे. तुम्हाला लोभ ,माया ,हाव,तृष्णा ,कामतुष्णा आहे तर दुःख आहे ,जर तुष्णा च नाही तर दुःख च नाही मंजे दुःखाचे मूळ कारण मंजे हाव
3)
दुःख निवारन :- या सर्व गोष्टी मूळ दुःख होते त्याचा नाश कसा करावा ,त्या दुःख चे निवारण कसे करावे.बुद्ध सांगता दुःखाचे कारण हाव आहे तुष्णा आहे मंजे या दोन गोष्टीचा नाश झाला मंजे दुःखचा सुद्धा नाश होणार, दुसरा कुठला ही पर्याय तुम्ही अवलंबला तरी दुःख नहिशे होणार नाही ,दुःख निरतंर सदा या जगात राहेल .किंवा काहि वाइट गोष्टी संपवल्या किंवा तुम्ही सुद्ध मेले तरी या जगातून दुःख संपणार नाही .

4)
दुःख निवारण्याचा मार्ग
हाव आणि तृष्णा यांचा नाश केला मंजे दुःखा चा नाश होतो हे समजले पण या हाव आणि तुषणेला कही पर्याय आहे का दुसरा कही उपाय आहे की नाही ? जर तुमच्या पायात कटा रुतला असेल त्यामुळे तुम्हाला खुप वेदना होत आहेत त्यामुळे दुःख होत आहे तुम्हाला .यात दुःखाचे कारण कटा आहे आता तो सुरक्षित रीत्य कसा काढ़ावा ,दुःखाचे नाश करायचा म्हणून पायच तोडून टाकायच का ? नाही. मग...
त्या साठी बुद्धानी अष्टांग मार्ग सांगितले आहे तो मंजे सम्यक मार्ग होय.


बुद्धानी आठ मार्ग सांगितले आहे त्याला आपण आष्ठगाथा म्हणतो 
1)
सम्यक द्रुष्टी
2)
सम्यक संकल्प
3)
सम्यक वाचा
4)
सम्यक कार्य
5)
सम्यक आजीव
6)
सम्यक व्यायम
7)
सम्यक स्मुर्ती
8)
सम्यक समाधी
हे आठ मार्ग बुद्धानी सांगितले आहे यात सम्यक हां शब्द प्रत्येक शब्दला ला जोडला आहे ,

सम्यक मंजे " मधला मार्ग".
मजे पर्त्येक गोष्टी चा मधला मार्ग .कुठल्या एखांद्या गोष्टी चा पाहिले टोक आणि शेवट चे टोक या मधील जो मार्ग आहे त्याला सम्यक म्हणतात .
सरळ आणि आजच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रमाणामधे (लिमिट)
बुद्धानी सांसार केला तिकडे ही त्यांना दुःखा चा अनुभव आला ,नतर त्यांनी खुप दिवस उपासी पोटी तपस्या केली तरि त्यांना काहि बोध झाला नाही, या नंतर बुद्धानी जो परिव्रज्या चा मार्ग अवलम्बला तो सम्यक मार्ग होय
असाच बुद्धाचा सम्यक मार्ग अवलम्बनारे संत तुकाराम महाराज होते ,कही लोक असे म्हणतात संसार करुणी परमार्थ साधला , मंजे त्या काळी देवाचा शोध घेण्या साठी आज काल च्या साधू सारखे मंदिर देवळ जंगल नाही हिंडत बसले .त्यांनी बुद्धाचा सम्यक मार्ग अवलम्बला होता .

No comments: