"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळीप्रीती निभावण्याची माझी त-हा निराळी
झाल्या प्रतारणेवर देते हसून टाळी

डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी

फेसाळत्या मनाची बेभान लाट होते
ना पोर्णिमा तरीही भरते तिन्ही-त्रिकाळी

'विसरून जायचे' हे ठरण्यात रात्र जाते
हटकून याद येते त्याची पुन्हा सकाळी

याचे असो कि त्याचे, टिकते कुठे निरंतर
काळानुरूप घटते प्रेमातली नव्हाळी

दु:खास मांडताना वेष्टण हवे सुखाचे
नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळी

-सुप्रिया.

No comments: