"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

रिचर्ड थॅलेर- Behavioural Economics


वर्तणुकीचे अर्थशास्त्र (Behavioural Economics) मध्ये संशोधन करणारे फार कमी लोक आहेत. रिचर्ड थॅलेर वर्तणुकीचे अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत ज्यांना सर्वोच्च संम्मान नोबेल देऊन गौरविण्यात आल.

कोणत्याही आर्थिक सिद्धांताची सुरवात मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या भागीविण्यासाठी जी संसाधने (resources) आहेत त्यांची उपयोगिता वाढवणे अशी होते, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांना त्यासाठी आपआपले सिद्धांत मांडले आहेत. वर्तणुकीचे अर्थशास्त्र थोडेसे वेगळे आहे आणि त्यामुळे रिचर्ड थॅलेर सारख्या वर्तणुकीचे अर्थशास्त्र मध्ये काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना त्याच्या या वर्तणुकीचे अर्थशास्त्र संकल्पनेवरून लोकांनी काही दशके चिडविले आहे.
वर्तणुकीचे अर्थशास्त्र हे मानसशास्त्र मधील अंतर्दृष्टीसह एकत्रित करून  मनुष्याने घेतलेले आर्थिक निर्णय हे संज्ञानात्मक पूर्वाग्रहांद्वारे किती आणि कसे प्रभावित आहेत हे दर्शविते. 9 सप्टेंबर रोजी थॅलेरचे कामाचा गौरव   नोबेल कमिटीने अर्थशास्त्र मध्ये त्यांना पुरस्कार देऊन केला. आणि अशाप्रकारे नोबेल पारितोषिक जिंकणारे श्री. थॅलेंर काही फारच कमी वर्तणुकीचे अर्थशास्त्रज्ञांपैकी एक झाले.

श्री. थॅलर यांची चार दशकांहून अधिक कालावधीची एक विलक्षण कारकीर्द आहे, त्यातील शेवटची दोन दशके  ही शिकागो विद्यापीठ बुथ स्कूल ऑफ बिझनेस मध्ये गेली. त्यांनी  मालमत्तेच्या किमती, वैयक्तिक बचत आणि मालमत्तेच्या गुन्हेगारी या विषयावर संशोधन केल. उदाहरणार्थ, थालेर यांनी मानसिक लेखाचा एक सिद्धांत विकसित केला, ज्यात स्पष्ट होते की लोक आर्थिक निर्णय कसे घेत आहेत हे संपूर्ण प्रभावाऐवजी वैयक्तिक निर्णयांच्या संकुचित परिणामांवरच अवलंबुन आहे. (behavioural finance). नोबेल कमिटीने श्री. थॅलेर यांच्या आत्म-नियंत्रणावरील संशोधनावर देखील प्रकाश टाकला, जो दीर्घकालीन नियोजन आणि अल्पकालीन प्रलोभनांमध्ये असणाऱ्या तणावाबद्दल आहे.

श्री. थॅलेर  यांनी जर्नल ऑफ इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हज, एक प्रतिष्ठित जर्नल या नियतकालिकाने नियमित स्तंभ लेखन केले आहे, त्यात शास्त्रीय सूक्ष्मअर्थशास्त्र सिद्धांतचे उल्लंघन करणार्या आर्थिक वर्तनाची पुनरावृत्ती होणारी उदाहरणे दिली. त्याचं पाहिलं पुस्तक 1991 मध्ये "अर्ध-व्यासंग अर्थशास्त्र" (“Quasi-Rational Economics”) या विषयापासून त्यांनी सुरूवात केली.

परंतु थालेर  कदाचित " Nudge theory" चे अग्रणी म्हणून सर्वात प्रसिद्ध आहे. सार्वजनिक-धोरणात्मक साधन म्हणून वर्तणुकीशी अंतर्दृष्टी वापरणे. Nudge theory  ही कल्पना नवीन नाही, पण संस्थांनी  त्यांच्या ग्राहकांच्या वागणुकीला आळा घालण्यासाठी फक्त वर्तणुकीचे विज्ञान (behavioural science ) उपयोग केला, भूतकाळात वापरल्या गेलेल्या या वर्तणुकीच्या विज्ञानाचा उपयोग संस्था आणि सरकारांनी उल्लेख आणि उपयोग निट केला नव्हता.

पण श्री. थालेर आणि हार्वर्ड विद्यापीठात कायदेशीर विद्वान श्री. कॅस सनस्टेन यांनी 2008 मध्ये "नुड्ज" या पुस्तकाचे लेखन केल्यापासून बदल सुरु झाला. या पुस्तकाने तर्कसंगत निर्णय प्रक्रिया या धारणेच्या आर्थिक मॉडेलेला धक्का दिला आणि लोकांना हे दाखवून दिले की चांगली निवडी करण्यासाठी संदर्भ कसा बदलला जाऊ शकतो. 2010 मध्ये थॅलेंर यांनी ब्रिटिश सरकारला जे त्यांच्या कल्पनांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करीत होते अशांची  Behavioural Insights Team  निर्मितीचा सल्ला दिला. आता अतिशय यशस्वी सरकारी युनिट अर्ध-खासगी कंपनीत सुरु करून जगभरातील सरकारांना सल्ला देतात.

वर्तणुकीचे अर्थशास्त्र ने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जगभरातील सरकारी विभागांमध्येही एक चांगले स्थान प्राप्त केले आहे. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका पर्यंत, तसेच विश्व बँक आणि संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थांमध्ये " Nudge theory" दृष्टिकोन कॉपी झाला आहे. श्री, थारेल यांना सन्मानित करण्याचा नोबेल समितीचा निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीची मान्यता आहे. परंतु त्यांनी पालटून दिलेल्या अर्थशास्त्रच्या  नव्या  आराखड्यालाही ते एक सन्मानचिन्ह आहे.

- प्रमोद रावदादा जाधव 

No comments: